केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला १५०० कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नातेवाईकांना दिले. मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या तेथून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले. हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.Hasan Mushrim hands over Rs 1,500 crore contract to relatives, alleges Kirit Somaiya
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला १५०० कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नातेवाईकांना दिले. मुश्रीफांच्या मुलाने बोगस बँक अकाउंट उघडले. या अकाउंटमध्ये ज्या कंपन्या बंद झाल्या तेथून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले. हा आयपीसीच्या अंतर्गत गुन्हा असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
सोमय्या यांनी पुण्यात लाचलुचपत विभागात हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार केली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारकडून ग्रामविकास विभागाला १५०० कोटी रुपयांचा निधी आला होता. त्याचे कंत्राट स्वतःच्या मुलाला दिले गेले अशी त्यांची तक्रार आहे. कंपनी 10 वर्षांपूर्वी बंद झाली होती त्या कंपनीच्या नावे कोट्यावधी रुपये मुश्रीफांनी लाटले. दिलीप वळसे पाटलांनी त्यांची बनवाबनवी कमी करावी. आता मी मुश्रीफांच्या जावयाविरोधात तक्रार दिली आहे. त्यावर लवकरच कारवाई होईल.
जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी सरकार चालवणारे शरद पवार आहेत. जरी मी गुन्हा केला असेल तर तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता. राज्यातील कुणीही चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचे सोमय्यांनी सांगितले.
सोमय्या यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App