विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Hasan Mushrif अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचा वेगळाच डाव त्यांच्याच तोंडून समोर आला. अल्पसंख्यांक म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर दावा केला.
– पण यात “डाव” कसा ते वाचा!!
हसन मुश्रीफ यांनी आज अजित दादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रात अजितदादांच्या रूपाने महायुतीने दुसरा उपमुख्यमंत्री आधीच केला देवेंद्र फडणवीस पहिले उपमुख्यमंत्री आणि अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री अशी रचना आधीच तयार आहे.
परंतु हसन मुश्रीफांनी अर्ज दाखल करताना आपल्याला कोणते मोठे खाते मिळेल की नाही माहिती नाही, पण आपण अल्पसंख्यांक म्हणून उपमुख्यमंत्री होऊ शकतो. इतर राज्यांमध्ये तीन-तीन उपमुख्यमंत्री होतात, तर महाराष्ट्रातही तसे होऊ शकते, असा दावा केला.
पण मूळात महायुती मधून असे कुठले अल्पसंख्याकांना उपमुख्यमंत्री करण्याचे प्रस्तावच समोर आलेले नाहीत. त्या उलट महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी मुस्लिमांच्या मतांना चुचकारण्यासाठी अल्पसंख्यांक उपमुख्यमंत्री हा “डाव” टाकून बघायचा प्रयत्न चालविला आहे. यातूनच हसन मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा उफाळली आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीत राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी दाखल करून नंतर उडी मारून महाविकास आघाडीत शिरकाव करण्याचा “डाव” स्वतःच्याच तोंडून बाहेर आणला आहे.
बाकी उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर केलेल्या भाषणात हसन मुश्रीफ यांनी आज आपल्या रॅलीत 1 लाखांपेक्षा जास्त लोक सामील झाल्याचा दावा केला. जनतेने 25 वर्षे आपल्याला आशीर्वाद दिला. यापुढेही या जनतेने आशीर्वाद द्यावा. आपण त्यांचा हमाल म्हणून काम करू, असे हसन मुश्रीफ म्हणाले.Hasan Mushrif
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App