विशेष प्रतिनिधी
नागपूर: ‘हसन मुश्रीफ हे काय माधुरी दीक्षित आणि डोनाल्ड ट्रम्प आहेत का? त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही.’ अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांना सुनावले आहे. hasan mushrif madhuri dixit or donald trump devendra fadnavis criticizes
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर टीका केली त्यालाच फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘असं आहे की, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याबद्दल हसन मुश्रीफ बोलले आहेत ते निंदनीय आहे. हसन मुश्रीफ काय माधुरी दीक्षित आणि डोनाल्ड ट्रम्प आहेत का? त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कोणी ओळखत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे स्टेटमेंट अतिशय चुकीचे आहेत. स्वतः पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकार सोबत बैठक घेऊन महाराष्ट्राला ऑक्सिजन घेऊन देण्याच्या संदर्भात व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून कसा ऑक्सिजन मिळेल याची सगळी मदत त्यांनी केली. मागच्या काळात रेल्वेची सगळी मदत केली. आत्ता प्रश्न एवढाच आहे की महाविकास आघाडीचे मंत्री काही काम करत नाही हे सगळे सकाळ-दुपार-संध्याकाळ मीडिया समोर उभे राहतात. केंद्र सरकारला दोष देतात.’ अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणाले होते?
नवाब मलिक यांनी केलेल्या बीनबुडाच्या आरोपावर देशाचे वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते.
यावर मुश्रीफम्हणाले की, ‘पियुष गोयल यांनी चुकीची टीका केली. मी त्यांचा निषेध करतो. ते असे म्हणाले महाराष्ट्रात भ्रष्ट सरकार आहे आणि सातत्याने राजकारण करतं. मुख्यमंत्र्यांनी हे डोस बंद करावेत. मुख्यमंत्री केंद्र सरकारशी सातत्याने समन्वय ठेवून आहेत. कोरोनासारख्या महामारीमध्ये राजकारण येऊ नये अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. आता पियुष गोयल यांची दुसरी टर्म सुरू आहे. ते देशाचे रेल्वेमंत्री आणि वाणिज्य मंत्री आहेत. गोयल यांची उद्योगपतींशी चांगली ओळख असावी. पण मी पियुष गोयल यांना सांगेन की, कोणत्याही ग्रामीण भागाच्या खेड्यांमध्ये त्यांना उभे करा आणि पाच माणसांनी त्यांना ओळखलं तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत असताना आपण राज्याचा अपमान करतोय हे विसरु नये.’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App