हसन मुश्रीफांवर ईडी छापे; 158 कोटी, 13 कोटी 85 लाख, 24 कोटी 75 लाख या आकडेवारीचे गौडबंगाल काय??

  • किरीट सोमय्यांचे आकडेवारीसह सवाल

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : साखर कारखाना घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या नातेवाईकांवर सक्तवसुली संचालनालय आणि इन्कम टॅक्स ने छापे घातल्यानंतर त्यांच्या घोटाळ्यांची वेगवेगळी माहिती समोर आली आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भातली वेगवेगळे आकडेवारी प्रसारमाध्यमांना दिली आहे. नुसते हसन मुश्रीफच नव्हे तर त्यासोबतच ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मिना यांचीही चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. Hasan Mushrif ED income tax raids; 158 cr, 13 cr, 24 cr transfer fraud?

एकूण 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.



किरीट सोमय्या म्हणाले :

विविध साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत आणि ते सर्व घोटाळे इंटरलिंक आहेत. केवळ हसन मुश्रीफच नाही अनिल परबही आहे आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा नंबर लागेल.

हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीची कारवाई सुरू झाली आहे. 158 कोटी रुपये हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या, मुलाच्या आणि जावयाच्या कंपनीच्या नावाने घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या अनेक बोगस कंपन्यांमधून स्वतःच्या कुटुंबीयांच्या कंपनीत घेतले. त्यानंतर ते पैसे सर सेनापती घोरपडे साखर कारखान्यात ट्रान्सफर केले.

कोल्हापुरातील आई महालक्ष्मी मला आज पावली. मला आठवतंय 28 सप्टेंबर रोजी मी कोल्हापुरात जायला निघालो होतो आणि त्यावेळी हसन मुश्रीफ, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी मला कोल्हापुरला जाऊ दिले नाही. पण आज महालक्ष्मीने आशीर्वाद दिला. हसन मुश्रीफांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.

रजत कंज्युमर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हसन मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात 13 कोटी 85 लाख रुपये आले. हे पैसे 2013 – 14 मध्ये आले. पण ती कंपनी 2004 मध्येच बंद झाली होती. जी कंपनी अस्तित्वातच नाही, त्या कंपनीच्या खात्यातून मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यात पैसे येतात. मुश्रीफ कुटुंबियांच्या खात्यातून ते पैसे साखर कारखान्याच्या खात्यात जातात, याचा अर्थ काय??

माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 24 कोटी 75 लाख रुपये, ही कंपनीही कधीच बंद झाली आहे. याच कंपनीच्या नावाने बँक अकाउंट उघडण्यात आले. हसन मुश्रीफ रोख पैसे दिले. त्याच पैशाचा चेक बनवून कुटुंबीयांच्या खात्यात जमा झाला होता.

Hasan Mushrif ED income tax raids; 158 cr, 13 cr, 24 cr transfer fraud?

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात