विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात पॉवरफुल समजला जाणारे मंत्रालयातला “कॉरिडॉर ऑफ पॉवर” अजित पवारांना लाभले नसून त्यांना सहाव्या मजल्यावरचे नव्हे, तर पाचव्या मजल्यावरचे 503 क्रमांकाचे दालन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहाल केले आहे. तेथे अजितदादांनी अर्थमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आज अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. Hall No. 503 on the fifth floor, not the sixth, in the ministry to Finance Minister Ajit Dada
मंत्रालयात सहाव्या मजल्याला महाराष्ट्रातले सर्वात पॉवरफुल “कॉरिडॉर ऑफ पॉवर” मानण्यात येते. कारण या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दालने आहेत. येथूनच संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार चालतो. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सहाव्या मजल्यावरचे 602 क्रमांकाचे दालन देण्यात येणार होते. परंतु ते दालन अपशकुनी असल्याचे कारण दाखवून त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाकीच्या मंत्र्यांनी ते दालन नाकारले. त्याच दालनातून छगन भुजबळ, अजित पवार आणि एकनाथ खडसे यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले, असे इतिहास सांगतो. पण हा त्या दालनाचा दोष की संबंधित मंत्र्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा दोष??, याचे उत्तर संबंधित मंत्र्यांनी अद्याप दिलेले नाही.
एरवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे अशी भाषणबाजी करत असतात. पण 602 क्रमांक असलेल्या दालनाला मात्र ते अपशकुनी ठरवून ते नाकारतात.
अजितदादांनी आता मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेत अर्थमंत्री झाल्यानंतर सहाव्या मजल्यावरचे दालन नाकारून ते पाचव्या मजल्यावर शिफ्ट झाले आहेत. तेथे त्यांना 503 क्रमांकाचे झालं मुख्यमंत्र्यांनी बहाल केले आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या रचनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राच्या सर्वोच्च “कॉरिडॉर ऑफ पॉवर” मध्ये विराजमान असतील, तर अजित पवार हे अर्थ खाते संभाळून शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री असतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more