विशेष प्रतिनिधी
नाशिक : बातमी नाशिकची. हळदीला वाजविले वाद्य अन मांडवात धडकले पोलिस अशी गमतीशीर घटना घडली आहे. पोलिसांनी चक्क ढोल-ताशा जप्त केला असून विना परवानगी वाद्य वाजविल्याप्रकरणी नवरदेवासह वाजंत्री विरुद्ध गुन्हा दाखल केला. लग्नबेडीत चतुर्भुज झालेल्या नवरदेवाला आता पोलिसांचाही बेडीत अडकावं लागणार असल्याच्या गमतीशीर चर्चेनं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आले आहे.haldi program muzical instruments Crime on Navradev
गंगापूररोडवरील पोलिस आयुक्त कार्यालयासमोर मल्हारखान झोपडपट्टीमध्ये जोरजोरात ढोल आणि ताशा ही पारंपरिक वाद्ये वाजविली जात होती. हळदी कार्यक्रमासाठी गर्दीही जमली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव हे त्यांच्या पथकासह मल्हारखान झोपडपट्टीत दाखल झाले.
सायरन कानी येताच लग्नघरी मांडवात शांतता पसरली. पोलिसांनी नवरदेव प्रसाद संतोष बुकाने याच्याकडे वाद्ये वाजविण्याची परवानगीबाबत विचारणा केली. बुकाने यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. प्रसाद यांच्या हळदीचा कार्यक्रम याठिकाणी सुरू होता.
पोलिसांनी तात्काळ वाजंत्री तसेच नवरदेवासह विरपित्यास ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांना समज देत विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन करून कोविड-१९ बाबतच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याने नवरदेव प्रसाद संतोष बुकाने, त्याचे वडील संशयित संतोष बुकाने आणि वाद्यवादक सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App