विशेष प्रतिनिधी
पुणे : सर्वत्र गुटखा बंद असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरात अवैध मार्गांनी गुटखा येतोच. यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आता अधिक सतर्क झाले आहेत. शहरात गुटखा येणारे मार्गच बंद करण्याची मोहीम आता पोलिसांनी हाती घेतली आहे. या अंतर्गतच शहरात अवैध गुटका, पान मसाल्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. Gutkha and Tobaco releted items of 52 lakhs Are captured from Tempo
एक संशयित मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी टेम्पोवर लक्ष ठेऊन तो ताब्यात घेतला. या टेम्पोमध्ये चक्क अवैध गुटका तसेच पान मसाल्याची पोती आढळली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. परंतु यामागे आणखी कोणाचा हात आहे का ? हे देखील तपासण्याचे काम सुरू आहे.
याटोळीकडून १०० पोती विमल गुटखा, १०० पोती तंबाखू मिळून आले आहे. तसेच एक मालवाहतूक करणारा टेम्पो पण जप्त करण्यात आला. आतापर्यंत पोलिसांनी या आरोपींकडून ५२ लाख २० हजार रुपये किंमती चा मुद्देमाल वाकड पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत तीन आरोपी गणेश वंजी साबळे, संदिप गुलाब ठाकरे आणि विशाल पांडुरंग लवाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App