प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाच्या दिशेने दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना कोर्टाने 14 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. परंतु आता सदावर्तेंचा ताबा सातारा पोलीस घेणार आहेत. सातारा पोलिसांना १७ एप्रिलपर्यंत ताबा घेण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.Gunaratna Sadavarten remanded in judicial custody for 14 days; However, Satara police will take control of Sadavarten; Jayshree Patil absconding
काही काळापूर्वी सदावर्तेंनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारे वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी सदावर्तेंवर सातारा शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिथे गुन्हा घडतो, तिथे त्या गुन्ह्याची चौकशी केली जाते. त्यामुळे सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा मिळणार आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील फरार असल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्तें यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर ७ आरोपींनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळली. त्यामुळे आता सदावर्ते जामिनासाठी अर्ज करू शकतात. तर अभिषेक पाटील आणि पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी या दोघा आरोपींना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांना आता सहआरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे. मात्र त्या फरार झाल्या आहेत, असे म्हणत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून दीड कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली, ही रक्कम गोळा करण्यात जयश्री पाटील यांचाही सहभाग आहे. त्यांच्याकडे सध्या 80 लाख रुपये आहेत, असा दावा प्रदीप घरत यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App