शिल्पकलेतील किमयागाराचा महासन्मान; राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

Maharashtra Bhushan Award

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिल्पकलेतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नवी दिल्ली नजीक नोएडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.Great honor for the alchemist in sculpture; Ram Sutar awarded Maharashtra Bhushan Award



शिल्पकलेसारख्या काहीशा अवघड कलेला आपल्या परिसस्पर्शाने नवीन आयाम मिळवून दिलेल्या सुतार यांचे या क्षेत्रातील योगदान निव्वळ अतुलनीय आहे. आपल्या शिल्पकलेने देशातील अनेक दिग्गज नेते, महापुरुष तसेच अनेक प्रभृतींची शिल्पे त्यांनी घडवली. आजवरच्या मूर्तिकलेतून साकारलेल्या शिल्पकृतींमधून त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल असे मत याप्रसंगी व्यक्त केले. त्यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने या पुरस्काराचे भूषण वाढले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड.आशिष शेलार, स्थानिक खासदार डॉ. महेश शर्मा आणि राम सुतार यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.

Great honor for the alchemist in sculpture; Ram Sutar awarded Maharashtra Bhushan Award

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात