प्रतिनिधी
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करत असताना देशाभरातील सर्वसामान्यांच्या डोळ्यात मात्र मोठ्या आशा दिसत आहेत जगातल्या मोठमोठ्या अर्थव्यवस्था एकीकडे चिंतेच्या गर्दीत लोटल्या गेल्या असताना भारतात मात्र आर्थिक दृष्ट्या सकारात्मक जे वातावरण आहे मोदी सरकार आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्प मांडणार असल्याने कृषी ते उद्योग आणि गरीब ते श्रीमंत अशा सर्व घटकांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत. Great expectations from union atmanirbhar Budget 2023 for framing, for industry and for poor to rich
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारतात आपलेही योगदान असावे असे 140 कोटी बाहेर यायला वाटते त्याचा मार्ग अर्थसंकल्पांच्या तरतुदींमधून जातो त्यातून आपल्याला काही मिळावे आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणे आपणही काही योगदान करू शकू अशी अपेक्षा सर्वसामान्य भारतीयांची आहे.
2024 च्या एप्रिल आणि मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्या आणि सर्वसाधारण निवडणूक बजेट असा कयास प्रसारमाध्यमांनी बांधला असला तरी त्या पलीकडे जाऊन मोदी सरकारचे अर्थसंकल्पातले जे नियमित सूत्र दिसते ते आत्मनिर्भर भारताचे दीर्घ सूत्र 2023 च्या अर्थसंकल्पात कायम राहणार आहे तरुणांसाठी रोजगार आणि हाताला काम कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढ त्याची आयात निर्यात व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रात एमएसएमई पासून ते बड्या उद्योगांना संरक्षण उत्पादनात महत्त्वपूर्ण सवलती आणि संधी या विषयी अर्थसंकल्पातून काय मिळणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे.
हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या काळातील 10 वा तर सीतारामन यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ह्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि महिला, उद्योजकांपासून ते स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांपर्यंत या अर्थसंकल्पात काय असणार याची उत्सुकता आणि धाकधूक दोन्ही आहे.
हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. याचे कारण म्हणजे कोरोनानंतरचा हा महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प आहे. वाढती महागाई, त्यासोबत वाढलेला रेपो रेट आणि सोन्याचे दर एवढेच नाही तर जीवनावश्यक वस्तूही वाढल्या आहेत. मागच्या दोन अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना टॅक्समध्येही कोणतीही सूट मिळाली नाही. कारण कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन टॅक्सचे लिमिट वाढवणार की सर्वसामान्य लोकांवर पुन्हा रडण्याची वेळ येणार याकडे लक्ष आहे. देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडून (अर्थसंकल्प-२०२२) प्रत्येक घटकाच्या अपेक्षा असतात. व्यापाऱ्याला व्यवसायात दिलासा हवा असतो सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
देश ने कोविड से अच्छी रिकवरी की है। आर्थिक सर्वेक्षण को देखें तो सभी क्षेत्रों में प्रगति हो रही है। अन्य देशों की तुलना में हमारी अर्थव्यवस्था अच्छी है। 2014 में भारत अर्थव्यवस्था के लिहाज से 10वें स्थान पर था, आज 5वें स्थान पर है: वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, दिल्ली pic.twitter.com/KROrAUYMHt — ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2023
देश ने कोविड से अच्छी रिकवरी की है। आर्थिक सर्वेक्षण को देखें तो सभी क्षेत्रों में प्रगति हो रही है। अन्य देशों की तुलना में हमारी अर्थव्यवस्था अच्छी है। 2014 में भारत अर्थव्यवस्था के लिहाज से 10वें स्थान पर था, आज 5वें स्थान पर है: वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, दिल्ली pic.twitter.com/KROrAUYMHt
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2023
बहुतांश नोकरदारांना अर्थसंकल्पातून सलवत मिळावी अशी अपेक्षा असते. चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नोकरदार लोक सातत्याने सरकारकडे टॅक्समध्ये सूट देण्याची मागणी करत आहेत, यावेळी त्यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी त्यांना आशा आहे.
यंदा मोदी सरकार टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळून जवळपास ८ वर्षे झाली आहेत. 2014 मध्ये मोदी सरकारने टॅक्सची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 2.5 लाख रुपये केली होती. त्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री होते. तर 60 वर्षांवरील आणि 80 वर्षांखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी करसवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाख रुपये करण्यात आली होती.
यावेळी सरकार अडीच लाखावरून 3 लाख आयकरात सूट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3 लाखांवरुन ही मर्यादा वाढवून 3.5 लाख रुपये वाढवले जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली: वित्त मंत्री निर्मला सीतारमण आज पेपरलेस बजट पेश करेंगी। #Budget2023 pic.twitter.com/50Sr0LOiEF — ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2023
दिल्ली: वित्त मंत्री निर्मला सीतारमण आज पेपरलेस बजट पेश करेंगी। #Budget2023 pic.twitter.com/50Sr0LOiEF
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App