विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप 340, अजितदादा गट 223, एकनाथ शिंदे गट 160, काँग्रेस 99, शरद पवार गट 68, उद्धव ठाकरे गट 67 ग्रामपंचायत निवडणुकीतली ही आकडेवारी पाहिली, तर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे भाजपने आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आपले पाय घट्ट रोवले आहेत. शरद पवारांचे ग्रामीण भागातले वर्चस्व पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. पवारांचा राजकीय वारसा पूर्णपणे अजित पवारांकडे आला आहे. शिंदे गट पुन्हा एकदा ठाकरे गटावर आपले वर्चस्व राखून आहे.
2559 पैकी 1180 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले, त्यावर आधारित हे निरीक्षण आहे.
शहरी पक्ष म्हणून हिणवला गेलेल्या भाजपला आता इथून पुढच्या भविष्यात महाराष्ट्रात केवळ शेठजी भटजींचा पक्ष म्हणून अजिबात हिणवता येणार नाही, अशी स्थिती या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झाली आहे.
त्या उलट ग्रामीण भागावर ज्यांची जबरदस्त पकड आहे असे परसेप्शन मराठी माध्यमांनी तयार केले होते, त्या शरद पवार गटाची आकडेवारी पाहिली तर शरद पवार आता केवळ विधानसभेतच डबल डिजिट उरले नाहीत तर ग्रामपंचायतींमध्ये देखील डबल डिजिटमध्ये आले आहेत. शरद पवारांचे ग्रामीण भागावरचे वर्चस्व उद्ध्वस्त झाले आहे. शरद पवारांचा संपूर्ण राजकीय वारसा हा अजित पवारांकडेच आला असल्याचे या ग्रामपंचायत निवडणूक निकालाने सिद्ध केले आहे.
या सर्व प्रकारात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट मात्र पुरते कुचंबून गेले आहेत. काँग्रेसला शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी ग्रामीण भागातली मूळची पकड काँग्रेसच्या हातातून निसटली आहे. अजित पवार गटाने शरद पवार गटाचा संपूर्ण पराभव करत शरद पवारांचा राजकीय वारसा आपल्याकडे आल्याचे सिद्ध केले आहे.
अजितदादा गटाची भाजपला टक्कर
अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे एकत्रित बेरीज भाजपला टक्कर देण्यासारखी झाली आहे. अर्थात अजित पवार गटाला भाजपने दूर सारले तर अजित पवार गटाची आत्ताची स्थिती जशीच्या तशी राहील याची कुठलीच गॅरंटी नाही, पण तरी देखील अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची एकत्रित बेरीज 160 होते आहे, याचा अर्थ ते भाजप पेक्षा 13 ग्रामपंचायतींनी मागे आहेत. भविष्यात या दोन्ही गटांनी एकत्र यायचे ठरवले तरी शरद पवार गटाला अजित पवार गटापडे शरणागती पत्करून एकत्र यावे लागेल पण त्याच वेळी फेरराजकीय मांडणीत एकनाथ शिंदे यांना भाजप अधिक बळ देऊन पुन्हा एकदा पवार फॅक्टरला मागे ढकळण्यात ढकलण्यास पुढे मागे पाहणार नाहीत. हे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीतल्या निकालांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App