प्रतिनिधी
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने गृहनिर्माण शाखेतील सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यासाठी 21 ते 40 वयोगटातील पदवीधर उमेदवार 25 ऑगस्टपर्यंत LIC च्या lichousing.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसह गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.Govt Job Golden Opportunity LIC Recruitment 80 Managers Age Limit Up To 40 Salary Upto 80K
काय आहे वयोमर्यादा?
भरती प्रक्रियेत सहभागी होताना सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान असायला हवे. तर सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे असणे गरजेचे आहे.
किती असेल वेतन?
सहाय्यक पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला 33,960 रुपये आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला 80 हजार रुपये वेतन दिले जाईल.
काय आहे पात्रता?
भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
कशी होईल निवड?
80 पदांसाठी भरती प्रक्रियेत, उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षेची वेळ 120 मिनिटांची असेल. ज्यामध्ये 200 प्रश्न विचारले जातील. जे कदाचित सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App