Govind Giri Maharaj : आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित होण्याची भीती; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची भाजपच्या आयात संस्कृतीवर टीका

Govind Giri Maharaj

विशेष प्रतिनिधी

पुणे : Govind Giri Maharaj अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी भाजपमधील आयाराम संस्कृतीवर सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची भाजपमध्ये आयात करण्यात आली आहे. यामुळे नाल्यांमुळे जशी गंगा प्रदूषित झाली आहे, तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.Govind Giri Maharaj

गत काही वर्षांत काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गोविंद गिरी महाराजांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाश कार्यक्रमात बोलताना वरील टीका केली आहे. ते म्हणाले, या शताब्दी वर्षात पूज्य डॉक्टरांपासून अनेक प्रचारकांची नावे समोर येत आहेत. यामुळे डोळे भरून येत आहेत. या लोकांनी जे तप केले, जो त्याग केला, त्या तपाला व त्यागाला न्याय द्यायचा असेल, तर देश टिकवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी संघाने सावध राहण्याची गरज आहे असे मला वाटते.Govind Giri Maharaj



गंगा नदी नाल्यांमुळे प्रदूषित तसा संघही

कारण, संघाच्या व्यापक झालेल्या कार्यात वेगवेगळ्या मार्गाने आयात केलेली मंडळी येतात. त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्या लोकांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता कशाशी खातात हेच कळत नाही. या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. गंगा शुद्धच आहे. पण गंगेत येऊन मिसळणाऱ्या नाल्यामुळे ती प्रदूषित झाली आहे. त्यानुसार संघ परिवारही आयारामांमुळे प्रदूषित होईल अशी भीती मला वाटत आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, प्राचीन ते मध्ययुगीन काळात भारतावर वेगवेगळ्या शक्तींची, परकीयांची आक्रमणे झाली. अनेक संकटे आली. मंदिरे पाडली गेली. विद्यापीठे उद्ध्वस्त केली गेली. हिंदुत्वावर आघात केला गेला. पण संघाने सुनियोजितपणे त्याचा प्रतिकार केला. देशाची संस्कृती व आंतरिक सजीवता कायम ठेवली. यामुळे भारत देशाला कुणालाही संपवता आले नाही. एवढेच नाही तर स्वतः संघालाही तीनवेळा संपवण्याचा प्रयत्न झाला. आपल्याला हा वारसा सांभाळून देशाला पुढे न्यायचे आहे.

समर्थ भारतासाठी हिंदूंची गरज

जगाच्या इतिहासात काही धर्मांध शक्तींनी अनेक धार्मिक स्थळे उद्धवस्त केल्याची उदाहरणे आहेत. पण जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे, ज्याने हिंदुत्वाची आस्था, प्रेरणा असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी बांधून दाखवले. यापूर्वी देशाच्या सीमांचा संकोच झाला. पण यापुढे असा संकोच होता कामा नये. समाजाला लागलेली कीड शोधताना हिंदूंची संख्या कमी होणार नाही याचे भानही आपल्याला ठेवावे लागणार आहे. जग सुखी हवे असेल तर समर्थ भारतासाठी हिंदू हवे आहेत, असे गोविंदगिरी म्हणाले.

Govind Giri Maharaj Criticizes BJP Import Culture RSS Pollution

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात