विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. जनजीवन पूर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने गाव जत्रा, तमाशा यांना परवानगी द्यावी, अशी मागणी तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केली आहे. Government should give Permission to Gavajatra, Tamasha: Raghuveer Khedkar
कोरोनामुळे कलावंतांची रोजीरोटीसाठी भटकंती सुरु आहे. ती थांबावावी,अशी कळकळीची विनंत रघुवीर खेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कलावंतांच्या प्रश्नात लक्ष घातले.
त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आता बाजारपेठा चालू झाल्या आहेत.त्याच पद्धतीने गाव जत्रा ,तमाशा सुरु करावेत. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या कलावंताना दिलासा मिळेल, अशी भावना रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली आहे.
गावजत्रा, तमाशाला सरकारने परवानगी द्यावी
कोरोनामुळे कलाकारांची मोठी कुचंबणा
कलावंतांची रोजीरोटीसाठी भटकंती सुरु
महाविकास आघाडीने कलाकारांकडे लक्ष द्यावे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App