बारामतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचे नाव; चौंडीच्या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांची घोषणा

प्रतिनिधी

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर देवी अहिल्यानगर करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. पण त्या पलीकडे जाऊन भाजपचे विधान परिषदेतल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत महत्त्वाचे घोषणा केली, ती म्हणजे बारामतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवींचे नाव देण्याचे त्यांनी जाहीर केले. या संदर्भातला शासकीय जीआर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काढल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.Government Medical College Baramati is named after Ahilya Devi

बारामतीतल्या कुठल्याही छोट्या-मोठ्या संस्थांचे नाव पवार घराण्यातले नेते ठरवत असताना प्रथमच त्यांच्या शहरातल्या शासकीय मेडिकल कॉलेज सारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचे नामकरण अहिल्यादेवींच्या नावाने करून त्याची घोषणा अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी मध्ये भाजपचे आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी करणे याला विशेष राजकीय महत्त्व आहे.



अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. त्याला गोपीचंद पडळकर यांनीदेखील दुजोरा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार, अशी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म आज जीवंत आहे, तो धर्म आज जीवंत नसता. अशा प्रकारचं कार्य या राजमातेने करुन दाखवलं. त्यामुळे जी मागणी होतेय की, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे, मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘अहिल्यानगर होणारच’

“आपले हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आपण छत्रपती शिवरायांचे नाव सांगणारे लोकं आहोत. आपण तुमच्याच नेतृत्वात संभाजीनगर तयार केले, आपण धाराशिव तयार केले. आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर झाले पाहिजे. मला विश्वास आहे, छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. तर अहिल्यानगर होणारच. तुमच्या मनात शंका ठेवण्याचं कारण नाहीय, असे मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु झाले. यावेळी त्यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच, अशी घोषणा केली. त्यामुळे टाळ्यांचा एकच गडगडाट सुरू झाला.’

गोपीचंद पडळकर यांच्याकडून आणखी एक मोठी घोषणा

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर गोपीचंद पडळकर यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत बारामती शासकीय मेडिकल कॉलेजचे नामांतर अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेज बारामती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा जीआर नुकताच काढण्यात आला. या बाबतची माहिती गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमात केली.

Government Medical College Baramati is named after Ahilya Devi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात