सरकारकडून राणेंना नियोजनबद्ध पद्धतीनं अडकवण्याचा कार्यक्रम सुरु आहे, असा आरोपही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला.Government launches planned program to arrest Rane; Praveen Darekar accuses the government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोलिसांनी कारवाई करताना नारायण राणे हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत याचं भान ठेवावं, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.सरकारकडून राणेंना नियोजनबद्ध पद्धतीनं अडकवण्याचा कार्यक्रम सुरु आहे, असा आरोपही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला.
पुढे दरेकर म्हणाले की , या प्रकरणी थोडीशी सादरसुचिता पाळण्याची गरज आहे.कारण पोलीस कुणाचे खासगी नोकर नाहीत.त्यामुळे कायद्यासमोर सर्वजण समान असले तरी केंद्रीय मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना काही विशेष अधिकार आहेत.त्यामुळं त्यांच्यावर पोलीस कारवाई करताना काही प्रक्रिया पार पाडावी लागते.
नितेश राणेंना अटक करायचं आहे. त्यासाठी नारायण राणेंवर दबाव आणायचा आहे.परंतू कायदे-कानून, नियम-नीती सर्वकाही गुंडाळून आम्हाला राणेंवर कारवाई करायचीच आहे, अशी सरकारची भूमिका आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App