महिलांनी तक्रार दाखल करण्यात पुढाकार घेतल्यामुळे न्याय मिळवणे सोपे झाले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना राज्यातील महिला सुरक्षा व गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. मुख्यमंत्री म्हणाले, महिलांनी तक्रार दाखल करण्यात पुढाकार घेतल्यामुळे न्याय मिळवणे सोपे झाले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘महिला सहाय्यता कक्ष’, ‘दामिनी पथक’ आणि ‘भरोसा केंद्रे’ कार्यरत आहेत तर सायबर गुन्ह्यांविरोधात नवी मुंबईत अत्याधुनिक सायबर हेडक्वार्टर सुरू करण्यात आले आहे. पोलिस दलात मोठ्या प्रमाणात भरती झाली असून, राज्य शासन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
तसेच महाराष्ट्रात महिला सुरक्षेसह गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ‘महिला सहाय्यता कक्ष’, ‘दामिनी पथक’, ‘निर्भया पथक’, आणि ‘भरोसा केंद्रे’ प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यातच रायगड पोलिसांनी एका विनयभंग प्रकरणात 24 तासांत चार्जशीट दाखल करून पुढील 24 तासांत आरोपीला शिक्षा मिळवून दिली, हे एक पथदर्शी उदाहरण ठरले आहे. असं सांगितलं.
याशिवाय, 2015 ते 2023 दरम्यान ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत 12 मोहिमा राबवून 38,910 हरवलेल्या मुलांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात आले. सायबर गुन्ह्यांविरोधात ‘महासागर’ हे देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर हेडक्वार्टर नवी मुंबईत स्थापन करण्यात आले असून 2024 मध्येच 440 कोटी रुपये गोठवून बँक फसवणुकीला आळा घालण्यात आला आहे. अशीही माहिती दिली.
तर पोलिस दलाच्या बळकटीसाठी मागील तीन वर्षांत 35,802 पोलिसांची भरती करण्यात आली महाराष्ट्राच्या इतिहासातला रेकॉर्ड भरती पूर्ण केलेली असून, रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ड्रग्सविरोधी लढ्यासाठी कठोर पावले उचलली जात असून, प्रत्येक पोलीस ठाण्यात अँटी-नार्कोटिक्स सेल स्थापन करण्यात आले आहेत. कोडीनच्या इम्पोर्टमध्ये मोठी घट झाली असून, फार्मसींना सीसीटीव्ही बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. नागपुरात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी स्थापन केली जात असून, ‘MARVEL’ प्रणालीच्या मदतीने 48 तासांत आरोपीला पकडण्यास यश मिळाले आहे. राज्य सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारी नियंत्रणात ठेवत असून, महिलांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री यांनी विधानसभेत सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App