विशेष प्रतिनिधी
ठाणे : शिंदे – फडणवीस सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज ठाणे जिल्ह्यात पार पडला. यावेळी विविध शासकीय योजनांचे लाभ ४५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना देण्यात आले. Government has benefited more than 45 lakh beneficiaries in Thane district in its Dari Yojana
लोकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयात खेटे घालावे लागू नयेत यासाठी शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज सर्वसामान्य लोकांमध्ये शासन आपला विचार करत आहे ही भावना दृढ झाली असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान होतोय, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासन आता ठाणे जिल्ह्यातही सहा नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी देण्यात येणार आहे. या निर्णयाने पोटदुखी वाढल्याने आता त्यावरही टीका सुरू झाली आहे. मात्र या टिकेला कामातून उत्तर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कल्याण – तळोजा मार्गावर आता मेट्रो धावणार आहे. त्याकामाचे भूमिपूजन आज झाले आहे. त्यासोबतच शीळफाटा येथील रस्ते रुंदीकरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदला दिला जाईल. कल्याण शहर रिंग रोड आणि मेट्रोने जोडले जाणार असल्याने भविष्यात इथून मुंबईत कुठेही प्रवास करणे सोपे जाईल असे मत व्यक्त केले. देशाला अधिक बलशाली बनवायचे असेल तर मोदीजींना पर्याय नाही त्यामुळे ४५ हून अधिक उमेदवार निवडून आणून मोदीजींचे हात बळकट करावे असे मत यावेळी व्यक्त केले.
यासमयी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार राजू पाटील, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर, कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड तसेच जिल्ह्यातील सर्व मनपांचे आयुक्त आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App