प्रतिनिधी
रत्नागिरी : धनगर आरक्षणाची मागणी लावून धरत महाराष्ट्रभर दौरा काढणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे रत्नागिरी दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर भरकटले आणि त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. Gopichand Padalkar’s helicopter went astray
गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्याचवेळी त्या आरक्षणातले अडथळे नेमके कोण??, हे प्रत्येक भाषणात ते सांगत आहेत. शरद पवारांनी वेगवेगळ्या समाजांना आरक्षणाच्या नावाखाली कसे झुलवत ठेवले, याचे सविस्तर वर्णन पडळकर आपल्या भाषणात करत आहेत. अनेक अनेकदा त्यांची जीभ घसरण्याच्या बातम्याही मराठी माध्यमे देत आहेत.
पडळकर रत्नागिरी दौऱ्यावर गेले होते. तेथे खेडमध्ये त्यांची सभा होती, पण दरम्यानच्या काळात तिथे वादळ सुरू झाले आणि हेलिकॉप्टर पुढे चालेनासे झाले. त्यामुळे पायलटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. मात्र, खेड मधली पडळकर यांची सभा झालीच. या सभेतही पडळकर यांनी पवार कुटुंबावरच निशाणा साधला.
पण आत्तापर्यंत हेलिकॉप्टर भरकटलेले गोपीचंद पडळकर हे एकच नेते नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तीन-चार वेळा त्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याच्या घटना घडल्या, पण ते सुरक्षित राहिले. आता गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी आल्याने समर्थकांमध्ये धास्ती निर्माण झाली. पण पडळकर सुरक्षित आहेत आणि ते त्यांचा धनगर आरक्षण दौरा पुढे नेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App