विशेष प्रतिनिधी
बीड : Gopichand Padalkar ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्याच्या समस्त ओबीसी समाजाची एक मोठी महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते उपस्थित होते.Gopichand Padalkar
या सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मराठवाडा हा क्रांतिकारी प्रदेश आहे. आज आमच्या अधिकारावर गदा येत आहे. 346 जाती आहेत मित्रांनो, आपण सर्वांनी एकत्र भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याची नितांत गरज आहे. आमच्या सगळ्यांचे ठरले आहे, आमचा नेता एकच आहे माननीय छगन भुजबळ. आपण कृष्णनीती वापरली पाहिजे. सगळ्यांनीच हातात सुदर्शनचक्र घेण्याची गरज नाही. सगळ्यांनीच हातात धनुष्यबाण घेण्याची गरज नाही, कधी कधी धनुष्यबाण अर्जुनाकडे द्यावा लागतो आणि आपल्या सगळ्यांचा अर्जुन इथे व्यासपीठावर बसला आहे आणि बाण त्यांच्या हातात आहे. आपण सगळे सैनिक आहोत.Gopichand Padalkar
पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, त्यांनी एक पिल्लू सोडले की धनगरांना एसटीमधून आरक्षण द्या, त्याला आमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडे बसला आहे हे तुम्हाला कळत नाही का धनगरांना? धनगरला काय वेडे वाटले का? घोडे लावण्याच्या तयारीत आहेत धनगर तुम्ही त्या तयारीला लागा. धनगर समाजाला दोन भूमिकेत जावे लागणार आहे. धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणे ही आमची प्राथमिकता आहे. तसेच ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा धनगरांवर आहे.
वंजारी समाजाचे आदर्श घेण्याची आवश्यकता
आपल्याला वंजारी समाजाचे आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. लढायचे कसे, उभे कुठे राहायचे, अधिकारी कसे व्हायचे हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगर समाजाने शिकण्याची गरज आहे. या प्रस्थापितांच्या छातीवर घरी जाऊन नाचाल एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे. माझा माळी समाज एकजूट आहे. परंतु, शांत आणि संयमी आहे. माळी धनगर वंजारी हा ‘माधव’ आता माधवराव करण्याची आवश्यकता आहे.
आपला एकच नेता छगन भुजबळ साहेब
पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, आपल्यात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसीचे संरक्षण महत्त्वाचे आहे. आपला एकच नेता आहे तो म्हणजे छगन भुजबळ साहेब आहेत. ते जी दिशा ठरवतील ती दिशा आपली असेल. सरसकटचे प्रकरण आले, आमच्या मामीला द्या, मामीच्या मामाला द्या, एवढे वादळ उठले होते आणि छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण एकजूट झालो आणि ते वादळ मिटवले. गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही. त्यांना वेगळे आरक्षण आहे, आमचा त्याला विरोध नाही.
गावातले वाद सगळे संपवून टाका, आपल्यातले भांडण मिटवा आणि ते जर नाही मिटवले तर तुम्ही माती होऊन जाल. संघटित होणे गरजेचे आहे. जीआरची चिंता तुम्ही करू नका, छगन भुजबळ लढत आहेत. जो प्रांत खोटा दाखला देईल, त्याला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे. यावर निर्णय झाला पाहिजे भुजबळ साहेब. जातीनिहाय जनगणना जेव्हा होईल तेव्हा यांचा बाजार उठलेला असेल हे लिहून ठेवा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App