विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यावर्षी सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात ८८० मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये ‘स्कायमेट’ने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. Good rainfall forecast for the state this year
राज्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकेल. पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात तापमानात किंचित घट झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पारा खाली आला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहील. उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App