कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणुक : गोकुळात २५ वर्षांनी सत्तांतर ; सतेज पाटील यांचा महाडीक गटाला धोबीपछाड


  • कोल्हापूर आणि पर्यायाने राज्याच्या सहाकार क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाची मतमोजणी आज पार पडली.

  • गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध सतेज पाटील , हसन मुश्रीफ असं चित्र पाहायला मिळालं. गेली २५ वर्ष याठिकाणी काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक या गटाकडे सत्ता होती. 

  • ‘ गोकुळ’च्या निवडणुकीसाठी रविवारी ९९.७८ टक्के मतदान झाले आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ७० केंद्रावर हे मतदान झाले . यापैकी सात तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले . 

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी ९ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली. कोरोनामुळे साधारण दीड वर्ष रखडलेल्या गोकुळच्या या निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान पार पडलं.या निवडणूकीत सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या महाडीक गटाला धक्का देण्यात विरोधी पक्षाची आघाडी यशस्वी ठरली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी पार पडलेल्या मतमोजणीत सत्ताधारी गटाला ४ तर विरोधी पक्षातल्या आघाडीने १७ जागा मिळवत गोकुळमध्ये सत्तांतर घडवून आणलं आहे.Gokul Dudh Sangh Final Result

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचं कोल्हापुरात महत्व आहे. अनेक राजकीय पुढारी आमदारकी नको पण गोकुळमध्ये पद मिळावं यासाठी उत्सूक असतात. गेल्या हंगामात माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या गटाचं गोकुळवर वर्चस्व होतं. यंदाच्या निवडणुकीसाठीही महादेवराव महाडीक, माजी खासदार धनंजय महाडीक, विद्यामान आमदार प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्र येऊन आघाडी तयार केली होती. याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील ३ मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपली आघाडी तयार केली.

३ हजार ६४७ सभासदांपैकी ३ हजार ६३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. ज्यानंतर रात्री ९ वाजता निकाल घोषित करण्यात आला. ज्यात मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने सत्तांतर घडवून आणत महाडीक गटाला धक्का दिला.

गेल्या काही निवडणुकांमध्ये सतेज पाटील यांनी महाडीक गटाला नेहमी धोबीपछाड दिला आहे. २०१९ लोकसभा, विधानसभा निवडणूकीत याचा प्रत्यय आला. ज्यानंतर कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही याचा प्रत्यय दिसून आला आहे.

Gokul Dudh Sangh Final Result

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात