राजमाता अहिल्यादेवींच्या तेजस्वी स्मृतीस अर्पण, रामतीर्थावर‌ आज सायंकाळी गोदावरी पूजन आणि महाआरतीचा सोहळा!!

Godavari Puja

विशेष प्रतिनिधी

नाशिक : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे निष्ठा, न्याय आणि धर्मपरायणतेचा अद्वितीय योग. त्यांच्या जन्माला त्रिशत वर्षे पूर्ण होत असल्याच्या पावन निमित्ताने, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने वर्षभर विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक व जनसामान्यांच्या सहभागातून अनेकानेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. व्याख्यानमाला, रांगोळीत पुण्यश्लोकांची जीवनपट,निबंध स्पर्धा,भक्तिभावाने ओथंबलेली महाआरती या सर्वांमधून जनतेने राजमातांना प्रेमांजली वाहिली.

आज 28 मे 2019 रोजी सायंकाळी 6.30 वाजता या व्रती कार्याचा समारोप एक दिव्य सोहळा ठरणार आहे. होळकर घराण्याचे वंशज,राजमान्य राजश्री श्रीमंत युवराज यशवंतराजे होळकर (तृतीय) यांचे शुभहस्ते गोदावरी पूजन आणि महाआरती संपन्न होणार आहे. हा क्षण केवळ धार्मिक नसेल, तर तो एक ऐतिहासिक साक्षात्कार ठरेल.

कार्यक्रमाला सरदार घराण्यांतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून विशेष उल्लेख करावासा वाटतो तो – श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे मामा घराणे, श्री अमरजीतसिंह बारगळ मामा – यांचा. त्यांच्या उपस्थितीने परंपरेची सात्त्विक छटा अधिक उजळून निघेल.



या समारंभात, संतसेवा संघाचे अध्यक्ष, थोर भागवतकार व संतप्रवचनकार युवकांचे प्रेरणास्थान पूज्य संजय गुरुजी यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान होणार आहे. त्यानंतर गोदामातेचे पूजन आणि महाआरती हा सोहळा भक्तिरसात न्हाऊन निघेल.

या कार्यक्रमासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फड, अध्यक्ष जयंतराव गायधनी, सुप्रसिद्ध उद्योजक धनंजय बेळे, शिवाजीराव बोंदार्डे, प्रफुल संचेती, उपाध्यक्ष नृसिंह कृपादास,कोषाध्यक्ष, सौ.अशिमा केला , सचिव मुकुंद खोचे, आणि अहिल्यादेवींचे गुरूजी वैभव क्षेमकल्याणी स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया,रामेश्वर मालाणी, नरेंद्र कुलकर्णी यांनी सर्व गोदाभक्त व अहिल्यादेवींचे अनुयायी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे साद घातली आहे.

हे केवळ एक आयोजन नाही, हे राजमाता अहिल्यादेवींच्या कार्यास समर्पित भावसुमनांजली अर्पण आहे. ज्यांनी नर्मदा तीर उजळवला, त्यांच्या सन्मानार्थ गोदातीरी हा दीप उजळणार आहे.

Godavari Puja and Maha Aarti ceremony at Ramtirtha this evening

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात