देशसेवेच्या संकल्पांसह युवा सैनिकांची गोदावरी महाआरती; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या उपक्रमास देशभरातल्या जवानांचा अभिमानास्पद प्रतिसाद!!

Godavari maha aarti

विशेष प्रतिनिधी

नाशिक : रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे संपन्न होणाऱ्या गोदावरी महाआरतीस आज विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले, जेव्हा देशभरातील विविध सैनिकी प्रशिक्षण केंद्रांतून आलेल्या सुमारे 200 हून अधिक युवा सैनिकांनी आरतीत सहभाग घेतला.

या भव्य महाआरतीत सहभागी होताना जवानांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” चा जयघोष करत संपूर्ण घाट परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून टाकला. त्यांनी गोदावरी मातेचे वंदन करत भारतमातेच्या रक्षणासाठी बळ प्राप्त होवो, अशी सामूहिक प्रार्थना केली. उपस्थित भाविकांच्या मनात या दृश्याने अभिमान, आदर आणि भावनिक ऊर्जेचा अनुभव निर्माण केला.

रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून ही महाआरती सातत्याने व भक्तिभावाने आयोजित करत असून, ही आरती नाशिककरांसह देशभरातील व विदेशातील श्रद्धाळू भाविकांसाठीही एक आकर्षण ठरली आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे देशविदेशातील पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे. या विशेष दिवशी जवानांची उपस्थिती ही केवळ धार्मिक सहभाग नव्हे, तर गोदावरी तीरावर भारतीय संस्कृती, आध्यात्म आणि देशसेवेचा संगम असल्याची जाणीव सर्वांनाच झाली.

Godavari maha aarti by yua sainiks at ramtirth Godavari seva samiti

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात