वृत्तसंस्था
मुंबई : उद्या 10 जुलैच्या बकरी ईद सणासाठी गो वंशाची कुर्बानी होऊ देता कामा नये. ती रोखली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती कारवाई करा, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून दिल्या आहेत. Goats should not be allowed to be sacrificed for Eid
विश्व हिंदू परिषदेने विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भात एक निवेदन दिले आहे. ते निवेदन देखील राहुल नार्वेकर यांनी आपल्या पत्राला जोडले आहे. उद्या 10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशी आहे. त्याचबरोबर बकरी ईद सुद्धा आहे. ईदच्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. कुर्बानी साठी गो वंशाची हत्या होण्याची दाट शक्यता आहे.
मात्र, महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. त्याचे तंतोतंत पालन उद्या झाले पाहिजे. बकरी ईदच्या दिवशी गोवंशाची कुर्बानी होऊ देता कामा नये. यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App