Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणाले, उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तर आश्चर्य नाही; अनेक टीकाकार आज भाजपत असल्याचा दिला दाखला

Girish Mahajan

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Girish Mahajan भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.Girish Mahajan

गिरीश महाजन यांच्या नेतृ्त्वात गुरुवारी नाशिक येथील मनसे व ठाकरे गटाचे बडे पदाधिकारी भाजपमध्ये आले. यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे व त्यांच्या समर्थकांनी या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध केला. विरोधी पक्षांनीही या प्रकरणी भाजपला खडेबोल सुनावले. पण गिरीश महाजन यांनी राजकारणातील वास्तव मांडत या टीकेला फारसे महत्त्व नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, जे आमच्यावर टीका करतात, ते उद्या आमच्यासोबतही येऊ शकतात. उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको.Girish Mahajan



भाजपचा विस्तार सुरू हेच वास्तव

ते म्हणाले, राजकारणात विरोध व टीका ही कायमस्वरुपी नसेत. आज भाजपमध्ये असणारे अनेक नेते पूर्वी भाजपविरोधात बोलत होते. पण आज तेच नेते भाजपमध्ये आहेत. आमदार व मंत्री अशा विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. यावरून पक्षवाढ हीच खरी राजकीय वस्तुस्थिती आहे हे स्पष्ट होते. भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. भाजपकडे विविध विचारांचे नेते येत आहेत. ही बाब पक्षाची ताकद दर्शवणारी आहे. पक्षाचा विस्तार होत आहे हीच खरी गोष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणी पक्षावर होणाऱ्या टीकेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. राजकारणात काहीही होऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे.

इतरांचे नेते घेणे हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण – संजय राऊत

उल्लेखनीय बाब म्हणजे संजय राऊत यांनी काल नाशिकमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावरून भाजप व गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. जे आमच्याकडून गेले किंवा मनसेतून गेले ते भटकेच आहेत. गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात. पण त्यांनाही नगरपालिकेत फटका बसला आहे. त्यांची पत्नी निवडून आली, पण इतर कारणांमुळे त्यांना त्यांना फटका बसला. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. गौतम अदानी सुद्धा भाजपचे सदस्य आहेत. इतरांचे आमदार, खासदार, नेते आपल्या पक्षात घेणे हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे, असे राऊत म्हणाले.

Girish Mahajan Says Sanjay Raut May Join BJP VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात