विशेष प्रतिनिधी
नाशिक : Girish Mahajan महायुतीमध्ये सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात थेट “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार,” असे ठामपणे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तर गिरीश महाजन यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपल्या पक्षाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. दोघांच्या विधानामुळे महायुती सरकारमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.Girish Mahajan
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवली होती. मात्र, स्थानिक नेत्यांच्या तीव्र विरोधामुळे अवघ्या एका दिवसात ही नियुक्ती रद्द करण्यात आली. तरीही, धुळ्यातील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात महाजन यांनी पुन्हा एकदा “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार” असे सणसणीत विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. “मी दरवर्षी नाशिकला जातो आणि आता तिथे पालकमंत्री म्हणून काम करणार,” असे महाजन म्हणाले.Girish Mahajan
गिरीश महाजन काय म्हणाले?
गिरीश महान यांनी धुळ्यातील एका दहीहंडी कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी तरुणांना संबोधित करताना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा दावा ठोकला. पाऊस सुरू असतानाही दहीहंडीचा उत्साह कायम आहे. मी दरवर्षी धुळ्यात येतो आणि नाशिकलाही जातो. आता नाशिकचा पालकमंत्री म्हणून काम करणार, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
सात आमदार आहेत, शक्ती लावू – भुजबळ
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी आपली भूमिका स्पष्ट केली. रायगडमध्ये आमची एकच जागा आहे. पण त्यासाठी आम्ही पालक मंत्रिपदाचा आग्रह धरतो. त्याप्रमाणे नाशिकचे सर्वाधिक 7 आमदार आहेत. त्यासाठी त्यांनीही पालकमंत्रिपदासाठी तितकाच आग्रह धरावा. पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न नाही. पण जर एकाच पक्षाचे सात आमदार असतील, तर त्या पक्षाला पालक मंत्रिपद मिळाले पाहिजे, याबद्दल मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी बोलेन. सात आमदारांचा दम आहे, शक्ती लावू, असे छगन भुजबळ म्हणाले.
गिरीश महाजनांचा दाव्यावरून यु-टर्न
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या धुळ्यातील विधानावरून यु-टर्न घेतला. मी पालकमंत्री होतोय असे मी कुठेही बोललेलो नाही. पालकमंत्री पदासंदर्भात आमचे नेते, वरिष्ठ आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील. मी कोणताही दावा करणार नाही आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे गिरीश महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App