Gas leak in Mumbai Kasturba Hospital : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचे वृत्त आहे. कस्तुरबा रुग्णालयाजवळ एलपीजी गॅसची गळती झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर 3 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहोचले. 58 रुग्णांना येथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यापैकी 20 रुग्ण हे कोरोनाचे रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असली तरी गॅस गळतीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. Gas leak in Mumbai Kasturba Hospital, 58 Patients relocated in nearby building
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती झाल्याचे वृत्त आहे. कस्तुरबा रुग्णालयाजवळ एलपीजी गॅसची गळती झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर 3 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहोचले. 58 रुग्णांना येथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यापैकी 20 रुग्ण हे कोरोनाचे रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असली तरी गॅस गळतीचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
कस्तुरबा हॉस्पिटल मुंबईच्या चिंचपोकळी भागातील आर्थर रोड जेलजवळ आहे. येथे एलपीजी गॅस पाइपलाइन लीक झाली. यानंतर रुग्णांना तातडीने रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. काही वेळातच सर्व रुग्णांना जवळच्या इमारतीत हलवण्यात आले. सर्व कर्मचारीही तत्काळ रुग्णालयातून बाहेर आले. गॅस गळतीची घटना उघडकीस आली तेव्हा जास्त रुग्ण नव्हते. यामुळे मोठा अपघात टळला. गॅस गळतीची घटना सकाळी 11.30च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर दुपारी 1.05 वाजता घटनास्थळी पोहोचल्या. कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे धोका वाढला नाही, असे त्या म्हणाल्या. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. अन्यथा त्याचे मोठ्या अपघातात रूपांतर होऊ शकले असते.
Gas leak in Mumbai Kasturba Hospital, 58 Patients relocated in nearby building
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App