विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी हनीफ कडावालाच्या हत्येच्या खटल्यामध्ये गँगस्टर छोटा राजनसह दोघांची सबळ पुराव्यांअभावी विशेष सीबीआय न्यायालयाने सुटका केली.Gangster Chota Rajan aqited from kadawala murder case
मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये हत्यारे पुरविल्याचा आरोप कडावालावर होता.अभिनेता संजय दत्तला हत्यारे लपविण्यात कडावालाने मदत केली, असा अभियोग पक्षाचा आरोप होता.
गँगस्टर टायगर मेमनच्या सांगण्यावरून त्याने मुंबईत हत्यारे आणली होती. त्याची हत्या फेब्रुवारी २००१ मध्ये वांद्रेमध्ये त्याच्या कार्यालयात झाली. तीन अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या खटल्यातील अन्य दोन आरोपी सन २००४ मध्ये निर्दोष सुटले आहेत. त्या वेळी राजन फरारी होता.
राजनला बालीहून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर सुमारे ७२ खटले त्याच्याविरोधात दाखल झाले. यापैकी हा एक खटला आहे. सध्या तो दिल्लीमध्ये तिहार तुरुंगात आहे. विशेष न्या. ए. टी. वानखेडे यांनी राजन आणि जगन्नाथ जयस्वाल यांची सबळ पुराव्यांअभावी मुक्तता केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App