Arvind Sawant : फ्रॉम गांधीजी टू शिवाजी, अमीन पटेल के साथ एवरीबडी!!; एकेरी उल्लेखातून अरविंद सावंतांची मुक्ताफळं!!

Arvind Sawant

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Arvind Sawant मुंबईतल्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या रॅलीमध्ये तुषार गांधी काय सामील झाले, तर लगेच उबाठा सेनेचे खासदार अरविंद सावंतांनी, “फ्रॉम गांधीजी टू शिवाजी अमीन पटेल के साथ एवरीबडी!!”, अशी मुक्ताफळं उधळली. रॅलीच्या उत्साहात आपण काय बोलून चाललोय, याचे भान देखील तीन टर्म खासदार राहिलेल्या अरविंद सावंत यांना उरले नाही.Arvind Sawant



काँग्रेस उमेदवार अमीन पटेल यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी मोठी रॅली काढली त्या रॅलीमध्ये महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि उबाठा सेनेचे खासदार अरविंद सावंत सामील झाले. या दोन्ही नेत्यांनी “संविधान बचाव” चा जुनाच मुद्दा पुन्हा उगाळला. केंद्रात मोदी सरकार परत आल्याने संविधानावरचा खतरा अजून टाळलेला नाही, असा दावा तुषार गांधींनी केला. त्या लोकांनी कुठली कामंच केली नाहीत. म्हणून ते आज पुन्हा हिंदू – मुस्लिम असा वाद उकरून काढत आहेत, पण आम्ही जनतेच्या आशा – अपेक्षांशी जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे, असा दावा अरविंद सावंत यांनी केला.

पण उत्साहाच्या भरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. “फ्रॉम गांधीजी टू शिवाजी आज लोक अमीन पटेल के साथ शामिल हुए है,” अशी मुक्ताफळं अरविंद सावंत यांनी उधळली. त्याचवेळी त्यांनी तुषार गांधींनाच महात्मा गांधींची उपमा देऊन टाकली. जणू काही तुषार गांधींच्या रूपाने महात्मा गांधीच अमीन पटेल यांच्या रॅलीत सामील झालेत, असा दावा अरविंद सावंत यांनी ठोकला. अरविंद सावंत यांच्या या मुक्ताफळांमुळे मोठा वाद उसळण्याची दाट शक्यता आहे.

Gandhiji to Shivaji, Everybody with Amin Patel!!; Arvind Sawant’s freedom from single mention!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात