राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी महाराष्ट्रातील मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्य चक्र वीरता पुरस्काराने सन्मानित केले. मेजर भुरे यांनी सहा दहशतवादी कमांडर ठार करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. तीन वर्षांपूर्वी या मोहिमेदरम्यान मेजर भुरे हे भारतीय लष्कराचे कॅप्टन होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या डिफेन्स डेकोरेशन सोहळ्यात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले. Gallantry Awards 2021 Maharashtra Major Mahesh Bhure got Shaurya Chakra, led the operation to kill 6 terrorist commanders
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी महाराष्ट्रातील मेजर महेशकुमार भुरे यांना शौर्य चक्र वीरता पुरस्काराने सन्मानित केले. मेजर भुरे यांनी सहा दहशतवादी कमांडर ठार करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. तीन वर्षांपूर्वी या मोहिमेदरम्यान मेजर भुरे हे भारतीय लष्कराचे कॅप्टन होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या डिफेन्स डेकोरेशन सोहळ्यात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
शौर्य चक्र प्रदान करताना त्यांच्याबद्दल असे म्हटले गेले की, “कॅप्टन महेशकुमार भुरे यांनी 25 नोव्हेंबर 2018 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये एका पथकाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्यांनी मोहिमेचे नेतृत्व केले आणि योजना आखली, ज्यामध्ये सहा टॉप दहशतवादी कमांडर मारले गेले.” त्यांचे शौर्य चक्र उद्धरणात म्हणण्यात आले की, “कॅप्टन महेशकुमार भुरे यांनी अचानक लक्ष्यित घराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांना पकडले. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकून आणि सतत गोळीबार करून वेढा तोडण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी जवळून अचूक गोळ्या झाडून प्रत्युत्तर दिले, ज्यात एक दहशतवादी मारला गेला आणि इतर अतिरेक्यांनी माघार घेतली.
मेजर भुरे (३०) हे मूळचे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी संपादन केली. 2014 मध्ये ते सैन्यात दाखल झाले. या मोहिमेत मेजर भुरे यांचे साथीदार असलेले लान्स नाईक नझीर अहमद वाणी यांना गेल्या वर्षी मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले होते.
चकमकीत जखमी झालेल्या आपल्या साथीदाराला पाहून कॅप्टन भुरे यांनी स्वत: धोका पत्करून त्याला आगीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी जोरदार गोळीबार करत आणखी एका दहशतवाद्याला ठार केले. “कॅप्टन महेशकुमार भुरे यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अनुकरणीय नेतृत्व आणि अतुलनीय धैर्य दाखवले,” असेही यावेळी सांगण्यात आले.
Gallantry Awards 2021 Maharashtra Major Mahesh Bhure got Shaurya Chakra, led the operation to kill 6 terrorist commanders
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App