वृत्तसंस्था
मुंबई – काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोड्याने मारण्याची भाषा वापरून देखील काँग्रेसच्या इराद्यांमध्ये फरक पडलेला नाही. From day one of assuming charge as Mumbai Congress chief, I’ve been saying that Congress will contest all 227 seats (of BMC) alone, Bhai Jagtap
काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेसच्या स्वबळाचा पुनरूच्चार केला आहे. तो करताना त्यांनी १९९९ पासूनच्या मुंबई महापालिकेच्या निवडणूकांचा हवाला दिला आहे. ते म्हणाले, की १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पाडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर देखील काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या निवडणूका स्वतंत्रच लढविल्या होत्या. त्यानंतर २०१४ पर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणूकांमध्ये काँग्रेस स्वबळावरच उतरली होती. काँग्रेसने या काळात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरपीआय या पक्षांसमवेत सत्तेचा वाटा शेअर केला आहे. पण निवडणूक नेहमीच स्वतंत्र लढत आलेली आहे. त्यामुळे मी आज सांगितलेले धोरण नवे नाही.
मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मी हेच सांगत आलोय की मुंबई महापालिकेच्या सर्व म्हणजे २२७ जागांवर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, याचा भाई जगतापांनी पुनरूच्चार केला.
काल शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची भाषा वापरणाऱ्या पक्षांना लोक जोड्याने मारतील, अशी भाषा वापरली होती. मात्र, ही भाषा त्यांनी कोणत्या पक्षाबाबत वापरली हे माहिती नाही, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उध्दव ठाकरे यांचा इशारा डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला.
आज भाई जगतापांनी नानांच्या पुढे जात उध्दव ठाकरे यांच्या कोणत्याही भाषेचा किंवा इशाऱ्याचा काँग्रेसला फरक पडत नसल्याचेच आपल्या वक्तव्यातून सूचित केले. त्यातूनच त्यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेचा पुनरूच्चार केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App