केंद्र सरकार देशातील प्रत्येक 18 वर्षांवरील व्यक्तीला मोफत लस देणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: मोफत लसीकरणावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरू आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष मोफत लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत.त्यातच आता देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मनसुब्यांवर पाणी असेच म्हणावे लागेल.Free vaccination: Free vaccine for everyone above 18 years of age from Government of India: Fadnavis
लसीकरणाच्या संदर्भात भारत सरकारने हे स्पष्ट केलं आहे की, प्रत्येक 18 वर्षावरील व्यक्तीला भारत सरकार मोफत लस देणार आहे.असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतील एका कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
काय म्हणाले फडणवीस?
‘प्रत्येक व्यक्तीला मोफत लस मिळणार
भारत सरकार या संपूर्ण कोव्हिड काळात राज्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे. लसीकरणाच्या संदर्भात देखील भारत सरकारने हे स्पष्ट केलं आहे की, प्रत्येक 18 वर्षावरील व्यक्तीला भारत सरकार मोफत लस देणार आहे.
‘हे जरुर आहे की, मार्केटमध्ये लस उपलब्ध होणार आहे. एखाद्या राज्याला वाटलं की, आपल्याला अत्यंत वेगाने लसीकरण करायचं आहे तर ते स्वत: ओपन मार्केटमधून लस खरेदी करुन लसीकरणाचा वेग वाढवू शकतात.
प्रायव्हेट NTT जे आहेत त्यांना असं वाटलं की, आम्ही लसीकरणाचा भार उचलू शकतो सरकारवर का भार टाकायचा? तर त्यांच्यासाठी देखील लस उपलब्ध आहे.
परंतु प्रत्येक व्यक्ती ज्यांना लस आवश्यक आहे आणि ज्याला ती मोफत हवी आहे त्याच्यासाठी माननीय मोदींच्या नेतृत्वात हे लसीकरण होणार आहे.
मला अभिमान आहे की, देशात सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात झालं आहे. यासाठी मी राज्य सरकार आणि सर्व लोकांचं अभिनंदन करतो.
पण त्यासोबतच सर्वात जास्त लसी सुद्धा महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिल्या म्हणून देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकाचं लसीकरण करु शकलो. याचाही आपल्याला विसर पडता कामा नये.
भाजपच्यावतीने अंधेरी व कांदिवली येथे १५० प्राणवायुयुक्त रुग्णशय्या क्षमतेच्या दोन करोना उपचार केंद्रांचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App