कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास दरमहा चार ते पाच लाख रुपये नफा मिळवून देताे असे अमिष दाखवून पुण्यातील एका व्यवसायिकाची ९९ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
प्रतिनिधी
पुणे –नवीन व्यवसायात भागीदारीत पैसे गुंतवणुक केल्यास दरमहा चार ते पाच लाख रुपये नफा मिळवून देताे असे अमिष दाखवून एका व्यवसायिकाची ९९ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संताेष चिंचवडे, राेशन चिंचवडे, अर्चना जगताप (सर्व रा.बाणेर,पुणे) या आराेपीं विराेधात सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Fraud of Buinessman by showing investment in New company
याबाबत रमेश दिलीप गायकवाड (रा.नऱ्हे,पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. रमेश गायकवाड आणि आराेपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात घरगुती संबंध आहे. सन २०१४ पासून आतापर्यंत आराेपींनी तक्रारदार रमेश गायकवाड व त्यांचे पत्नीस आम्ही नवीन व्यवसाय सुरु करत असून त्यात भागीदारीत गुंतवणुक केल्यास दरमहा चार ते पाच लाख रुपये नफा मिळवून देताे असे अमिष दाखवले.
त्यानुसार पेप्सी काे कंपनीत पार्टनरशीप करिता तक्रारदार गायकवाड यांनी एक काेटी २३ लाख ९६ हजार रुपयांची राेख रक्कमेत व चेकद्वारे गुंतवणुक केली. त्यापैकी केवळ २४ लाख ७७ हजार रुपये गायकवाड यांना आराेपींनी परत करत उर्वरित रकमेचा स्वत:च्या फायद्याकरिता अपहार करुन फसवणुक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सिंहगड पाेलीस पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App