जखमींवर स्थानिक रुग्णालया उपचार सुरू
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. Four dead 22 others injured in a collision between a truck and a private bus on Pune Bengaluru Highway
प्राप्त माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडला. जेव्हा कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने ट्रॅव्हल या मार्गाने जात होती. दरम्यान मालवाहू ट्रकने या बसला नवले पूलाजवळ जोरदार धडक दिली. यामुळे बस उलटली आणि बसमधील तीन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर २२ प्रवासी गंभीर जखमी झाले.
दुर्घटनेतील जखमींनी तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या महामार्गावर कायमच दुर्घटना घडत असल्याने, प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना तातडीने करणे अत्यावश्यक आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Maharashtra | Four dead, 22 others injured in a collision between a truck and a private bus on Pune–Bengaluru Highway near Narhe area of Pune city around 3 am today. The injured are being treated at a hospital. pic.twitter.com/CH9tJRWnAa — ANI (@ANI) April 23, 2023
Maharashtra | Four dead, 22 others injured in a collision between a truck and a private bus on Pune–Bengaluru Highway near Narhe area of Pune city around 3 am today. The injured are being treated at a hospital. pic.twitter.com/CH9tJRWnAa
— ANI (@ANI) April 23, 2023
पुणे-बंगळुरु महामार्गावरील कात्रज-नऱ्हे याठिकाणी अपघात घडल्याची माहिती मिळाली. मी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावे, यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अपघातात मृत पावलेल्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. तसेच अपघातातील जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, यासाठी प्रार्थना करतो. अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App