Raksha Khadses daughter केंद्रीयमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या विनयभंग प्रकरणी चौघांना अटक

मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

जळगाव : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा आणि तिच्या मैत्रिणींचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगावमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींची ओळख अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील आणि एका अल्पवयीन मुलगा अशी झाली आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी म्हटले की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींच्या छेडछाडीच्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

विनयभंग प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Four arrested in molestation case of Union Minister Raksha Khadses daughter

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात