प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक आणि चार मुख्यमंत्र्यांचे माध्यम प्रमुख राहिलेले संघ प्रचारक श्रीपाद सहस्त्रभोजने यांचे निधन झाले आहे. नागपुरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता, त्यानंतर माहिती व जनसंपर्क विभाग आणि नंतर अनेक शासकीय विभागात त्यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले.Former information and communications assistant director Shripad sahasrabhojane passed away
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बॅ. ए. आर. अंतुले आणि बाबासाहेब भोसले अशा 4 मुख्यमंत्र्यांचे माध्यम प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. 4 मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणारे ते कदाचित एकमेव अधिकारी होते. देहदान, रक्तदानाच्या क्षेत्रात त्यांनी सामाजिक कार्य केले. ‘असे जपले स्वयंसेवकत्त्व’ हे त्यांच्यावरील पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले होते.
https://www.facebook.com/100044197187974/posts/pfbid0325dTJYR23CiWf6RQ9ftMRrN9eTjBsT3NBHKjNw5VNSPLvbfykxEvxFE6a6RVi8Dl/?mibextid=Nif5oz
सरकारी सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी आंध्रप्रदेश, बंगाल आणि आसामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारुन त्यांनी स्वत:ला पुन्हा संघकार्यात झोकून दिले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीपाद सहस्रभोजने यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App