विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद – औरंगाबाद शहराजवळील आडगाव येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आडगाव येथील ग्रामस्थांनी यांच्याकडून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची लाडूतुला करण्यात आली. यावेळी नागरिकांची गर्दी दिसून आली.Forget the corona rules in Dr. Bhagwat Karad’s program at Aurangabad
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता निर्बंध लावले असून प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर शहरात होणारी राज्य नाट्य स्पर्धा ही रद्द करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री यांच्या सत्काराच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना याचा विसर पडल्याचे दिसत आहे,
जिथे कार्यक्रमाला पन्नास नागरिकांची उपस्थिती पाहिजे. तिथे हजारापेक्षा जास्त नागरिक कार्यक्रमात दिसून आले आहे.आणि त्यात पण वरून नियमांचं विसर पडल्याचे चित्रआडगाव येथील कार्यक्रमात दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App