Chhatrapati Sambhajinagar : राज्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू-बीम तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग उपचार

Chhatrapati Sambhajinagar

मराठवाड्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ही सेवा एक वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ‘ट्रू – बीम युनिटचे उदघाटन व राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण’ पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.Chhatrapati Sambhajinagar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीमसारखी कॅन्सरवरील उपचारासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सरवर उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरपी यासारख्या पद्धती वापरल्या जात आहेत. मात्र, ट्रू बीमसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे केवळ संक्रमित भागावर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय कमीत कमी वेळात उपचार करणे आता शक्य झाले आहे. यापूर्वी या उपचारासाठी राज्यातील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. देशभरातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या रुग्णांमुळे टाटा हॉस्पिटलवर प्रचंड ताण होता. मात्र, आता छत्रपती संभाजीनगर येथेही ही सेवा उपलब्ध झाल्याने मराठवाड्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ती एक वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

2016 साली या रुग्णालयाला राज्य कर्करोग रुग्णालयाचा दर्जा दिला होता. तेव्हापासून असंख्य रुग्णांना येथे चांगले उपचार मिळाले आहेत. आता ‘ट्रू-बीम’ सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचारांची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. तसेच ‘पेट स्कॅन’ (PET scan) सुविधेला मान्यता दिल्याने कर्करोगाच्या संपूर्ण निदान आणि उपचाराची सोय याठिकाणी उपलब्ध होणार आहे.

कर्करोगाचे लवकर निदान झाले, तर सर्व प्रकारचे कर्करोग पूर्णतः बरे करता येऊ शकतात. राज्य सरकार केवळ उपचारच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहिमाही राबवत आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षांत सुमारे 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी सुमारे 5000 कोटींचे कर्ज उभारण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यांतील सामान्य रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र नवीन सामान्य रुग्णालये उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून येत्या 3 ते 4 वर्षांत आरोग्य सेवांची त्रिस्तरीय यंत्रणा उभारली जाईल. यामुळे प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे आतापर्यंत 12 कोटी नागरिकांना ‘आरोग्य विमा कवच’ प्रदान करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. संजय केनेकर, आ. अनुराधा चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

For the first time in the state cancer treatment using True-Beam technology at Chhatrapati Sambhajinagar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात