विशेष प्रतिनिधी
मुंबई – गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मंडप, सजावट, रोषणाई इत्यादी साहित्य विक्रीवर कोकणातील महापुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारातील दुकानदार मुंबईतील घाऊक बाजारपेठेत येतात. यंदाच्या गणेशोत्सवावर महापुरामुळे मंदीचे सावट घोंघावू लागले आहे.Flood will affect market in ganesh fetival
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरू लागल्याने कोकणातील किरकोळ विक्रेते मुंबईत येण्याच्या तयारीस लागले होते; मात्र मुसळधार पावसाच्या तडाख्यात कोकणातील आर्थिक उलाढाल कोलमडून पडली आहे.
वीज देयक, दुकानाचे भाडे थकल्याने दुकानदारांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. तरीही पूरस्थिती निवळल्यानंतर सजावट व्यवसायाला उभारी येण्याची आशा मुंबईतील घाऊक व्यापारी बाळगून आहेत.
क्रॉफर्ड मार्केट परिसरातील घाऊक सजावटीच्या दुकानात ग्राहकांची रेलचेल कमी आहे. गणेशोत्सवानिमित्त एकदोन महिने आधीच तयारी सुरू होते. गणेशमूर्ती, देखावा यासाठीचे नियोजन सुरू होते.
आकर्षक देखावा तयार करण्यासाठी अनेक संकल्पनांवर गणेशभक्त काम करीत असतात. सजावटीसाठी लागणारे विविध आकारांतील विद्युत दिवे, रोषणाई, एलईडी दिव्यांच्या पट्ट्या, प्रकाशझोतांच्या दिव्यांची खरेदी मंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App