Ekta Nagar : एकता नगर परिसरात पुरजन्य परिस्थिति ; स्थानिक नागरिक संतप्त

Ekta Nagar

विशेष प्रतिनिधि 

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे पुण्यातील बऱ्याच भागात पाणी साचलेले आहे. परंतु याचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरील एकता नगर भागाला बसला आहे. Ekta Nagar



पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने रहिवाशांना संपूर्ण रात्र तणावात घालवावी लागली. दरम्यान, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, पाणी काढून टाकण्यासाठी पंप तैनात केले आणि लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक रहिवाशांना जवळच्या शाळा आणि कम्युनिटी हॉलमध्ये हलवण्यात आले.

पीएमसी आयुक्त नवल किशोर राम यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे असे त्यांनी सांगितल. अधिकाऱ्यांनी नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवर जाण्याचे टाळण्यास सांगितले आहे. Ekta Nagar

नगरसेवक सचिन दोडके हे देखील रात्री एकता नगर परिसरात उपस्थित होते. ‘मागच्यावर्षी देखील अशीच परिस्थिति होती. अनेक नागरिकांच्या गाड्या यामुळे इथे खराब होतात व नागरिकांचे प्रचंड नुकसान होते,’ अशी प्रतिक्रिया देत त्यांनी दरवर्षी सारखीच परिस्थिति निर्माण होत असल्याचं सांगितलं.

स्थानिक नागरिक संतप्त

नागरिकांना घरातून बाहेर निघण्याच आव्हान प्रशासनाकडून केलं जातंय मात्र अनेक नागरिकांनी घर सोडण्यास नकार दिला आहे. तसेच अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या बोंगळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ‘शासनाने यासंदर्भात काही तरी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. मात्र शासनाकडून सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.  Ekta Nagar

‘३० वर्षांपासून हीच परिस्थिति आहे मात्र कोणीही कायमस्वरूपी उपाययोजना करायला तयार नाही. नेते या ठिकाणी येतात बरीच आश्वासनं देतात मात्र कोणीच काहीच करत नाही,’ असे ३० वर्षांपासून तिथेच वास्तव्यास असणाऱ्या एका नागरिकाने सांगितले.

पाऊसाचा जोर वाढल्यामुळे मुठा नदीत ३५ हजार क्युसेकपेक्षाही जास्ती पाणी रात्री सोडण्यात आले होते. मात्र आता त्याचा विसर्ग आणखी वाढवून ४० हजार क्युसेक पेक्षाही जास्ती करण्यात आलेला आहे. यामुळे एकता नगर परिसरात आता पुर सदृश परिस्थिति निर्माण झालेली आहे. यामुळे तेथील स्थानिक मंडळातील गणेश मूर्ती देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहे. Ekta Nagar

सध्या एकता नगर परिसरात पुणे महापालिकेच्या आपत्ति व्यवस्थापन विभागाच्या वतीने पाणी अडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Flood situation in Ekta Nagar area; Local citizens angry

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात