पहाटे गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला
विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील आष्टा फाट्याजवळ जामखेड -अहमदनगर मार्गावर आज पहाटे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. यापैकी जवळपास आठ ते नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. Five dead 25 injured in travel accident in Beed
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन, मदत व बचाव कार्य सुरू झाले. आमदार सुरेश धस हे देखील घटनास्थळी पोहचले.
अपघातामधील जखमींना आष्टी येथील शासकीय रूग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना अहमदनगर येथील रूग्णालयात नेण्याता आले आहे. पहाटेच्यावेळी प्रवासी गाढ झोपेत असतानाच हा भीषण अपघात घडला. बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ही बल उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App