वृत्तसंस्था
पुणे : कोकेन अमली पदार्थाची विक्री करणा-या नायजेरियन तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. Five and a half lakh cocaine seized from Nigerian smugglers in pune
ओलमाईड किस्तोफर कायोदे (वय ४२, रा. वडाची वाडी, मूळ नायजेरिया) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३० हजार रुपयांचे ५३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.उंड्री वडाचीवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये नायजेरियन तरुण राहत असून तो चोरून कोेकेनची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अमलदार योगेश मोहिते यांना मिळाली.
त्यानुसार निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ५३ ग्रॅम कोकेन आढळले. त्याच्याविरुद्ध कोंढवा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी यांच्या पथकाने केली.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App