प्रतिनिधी
पुणे : EV company पुणे शहरातील कात्रज परिसरात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत मंगळवारी दुपारी चार वाजून आठ मिनिटांनी आग लागली होती. त्यात निर्माणाधीन १५० दुचाकी जळाल्या. तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी आग लागल्याच्या कारणाचा शोध घेत आहेत.EV company
कात्रज-गुजरवाडी रस्त्यावर साई इंडस्ट्रिअल इस्टेट हा औद्योगिक परिसर आहे. येथे भूषण एंटरप्रायजेस नावाची इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी कंपनी आहे. येथे सुमारे दोन हजार इलेक्ट्रिक दुचाकीचे साहित्यही ठेवण्यात आले होते. तेथे आग लागल्याने कंपनीत मोठी धावपळ उडाली आणि भयभीत झालेले कंपनीतील कामगार तातडीने बाहेर पळाल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे गंगाधाम, कात्रज, कोंढवा बुद्रुक, पीएमआरडीए येथील सहा बंब आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणली. आगीत वाहनांचे सुटे भाग, बॅटरी, तसेच अन्य साहित्य जळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App