विशेष प्रतिनिधी
मुंबई : सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा अखेर ठरली आहे.गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावापार पडणार आहे. Finally, the venue of Shiv Sena’s Dussehra rally was decided; Dussehra festival will be held at this place
50 टक्क्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार असून सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते उपनेते, मंत्री, मुंबईचे आमदार, महापौर आणि मुंबई महानगरपालिकेतले काही काही महत्वाचे नगरसेवक या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. दसरा मेळावा कोरोनाचे नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याबद्दल चर्चा चालू आहे. मुख्यमंत्र्यांचीही तीच इच्छा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App