विधिमंडळात मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये दादागिरी, सभागृहात जंगली रम्मी; सगळीकडेच “पवार संस्कारितांची” हुल्लडबाजी!!

नाशिक : विधिमंडळात मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये दादागिरी, सभागृहात जंगली रम्मी; अशी सगळीकडेच “पवार संस्कारितांची” त्यांची हुल्लडबाजी!!, असे चित्र महाराष्ट्रात उभे राहिलेय.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात खुन्नस काढता काढता पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुरते घसरले. जितेंद्र आव्हाड यांच्या नितीन देशमुख नामक समर्थकाने विधिमंडळाच्या आवारात मारामारी केली. आव्हाडांचा हा समर्थक कार्यकर्ता मोबाईल चोर निघाला. त्याच्यासाठी आव्हाड पोलिसांच्या गाडीपुढे आडवे पडले. विधानसभा अध्यक्षांनी खेद व्यक्त करायला सांगितल्यानंतरही विधानसभेत भाषण ठोकत बसले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना झापून काढले. आव्हाडांच्या निमित्ताने विधिमंडळात पवारांच्या संस्कारांचे पुरते वाभाडे निघाले. पण हे वाभाडे इथपर्यंतच थांबले नाहीत.

– रोहित पवारांची दादागिरी

पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दादागिरी केली. तुम्ही आमदाराशी आवाज चढवून बोलू शकत नाही बोलता येत नसेल तर गप्प बसा असे रोहित पवार स्वतःच आवाज चढवून पोलिसांवर डाफरले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि “पवारांचे संस्कार” सगळ्या महाराष्ट्राला दिसले. राजकीय घराण्यात जन्माला आले म्हणून दादागिरी केली हे बोल त्यांना ऐकावे लागले. पण हे देखील कमी पडले म्हणून की काय…



– माणिकरावांची जंगली रम्मी

पवार संस्कारित मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत जंगली रम्मी खेळताना दिसले. त्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनीच व्हायरल केला. त्यामुळे एका पवार संस्कारिताने दुसऱ्या पवार संस्कारिताचे कारनामे उघड्यावर आणल्याचे दिसले. त्यावर आपण जंगली रम्मीची जाहिरात मोबाईलवर कशी चालते आणि त्यामुळे तरुणाई कशी बरबाद होते हे दुसऱ्याला सांगत होतो अशी मखलाशी माणिकराव कोकाटे यांनी केली. या मुद्द्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली. त्यांचे मंत्रिपद धोक्यात पोहोल्याच्या बातम्या आल्या.

पण एवढे सगळे गदारोळ “पवार संस्कारितांनी” केले यावर शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे काही बौद्धिक पातळीवर व्यक्त झाल्या नाहीत. एरवी सुप्रिया सुळे या यशवंतरावांचे संस्कार + सुसंस्कृत महाराष्ट्र + आई-वडिलांचे संस्कार + पुरोगामी महाराष्ट्र असे जड जड शब्द फेकून मोठमोठ्या बाता मारत असतात. पण पवारांनी संस्कार केलेले नेते विधिमंडळाच्या आवारात मारामाऱ्या करतात, सभागृहात बसून जंगली रम्मी खेळतात आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दादागिरी करतात याविषयी चकार शब्द बोलल्या नाहीत. त्यांनी जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि माणिकराव कोकाटे यांना पवारांच्या संस्कारांची आठवण करून दिली नाही.

Fights in the legislature, bullying in the police station, wild rummy in the assembly

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात