विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस प्रत्यक्षात स्थिर असताना राज्यात अस्थिरता असल्याचे भासवत मराठी माध्यमे विशिष्ट नॅरेटिव्ह चालवत आहेत. यातला एक नॅरेटिव्ह म्हणजे एकनाथ शिंदे पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार??, याचे सर्व्हे घेतले जात आहेत. असाच एक सर्व्हे एबीपी माझा – सी व्होटर संस्थेने घेतला आहे आणि त्यामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच मुख्यमंत्री पदाची स्पर्धा घासून असल्याचे पुढे आले आहे. पण या सगळ्यात राष्ट्रवादीतले इच्छुक मात्र किती पिछाडीवर गेलेत?, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आणि तीच उघडून डोळे नीट बघण्याची गरज आहे.Fierce competition between Thackeray and Fadanavis, ajit Pawar lagging too much behind
या सर्व्हेत सहभागी झालेल्या जनतेचा 28 % कौल उद्धव ठाकरेंना आहे, तर 26 % मते देवेंद्र फडणवीस यांना आहेत, तर स्वतःहून सकाळच्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा जाहीर करणाऱ्या अजित पवारांना फक्त 11 % जनतेने कौल दिला आहे. याचा अर्थ ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्येच मुख्यमंत्री पदासाठी घासून स्पर्धा आहे पण राष्ट्रवादीतले सध्याचे टॉपचे इच्छुक फक्त 11 % मते मिळवून नुसते तिसऱ्या क्रमांकावर मागे नाहीत तर फारच पिछाडीवर आहेत. इतकेच नाही तर राष्ट्रवादीतले दुसरे स्पर्धेत जयंत पाटील यांचे तर त्या सर्व्हेत नावही दिसत नाही. त्यातील शरद पवारांच्या मनातील मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही या सर्व्हेत पत्ता नाही!! या सर्व्हेचा सर्वोच्च कौल 35 % “माहिती नाही”, या उत्तराला आहे. पण खरी स्पर्धा ठाकरे आणि फडणवीस यांच्यातच आहे आणि राष्ट्रवादीचे इच्छुक तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाऊन ते फारच पिछडीवर असल्याचे एबीपी – सी व्होटरचा सर्व्हे सांगतो आहे.
जनमताचा हा कौल राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे डोळे उघडणार का??, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सरकार अस्थिर आहे. एकनाथ शिंदे लवकरच पायउतार होणार आहेत, असा पवाररनिष्ठ नॅरेटिव्ह चालवण्याची जी मशक्कत मराठी माध्यमे करत आहेत, त्या नॅरेटिव्हला जनमताच्या कौलाने धक्का दिला आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App