प्रतिनिधी
संभाजीनगर : संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवणे तर दूरच त्याउलट संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा या मुद्द्यावरून भाजप काढणार असलेल्या आजच्या जल आक्रोश मोर्चावर ठाकरे पवार सरकारने 14 अटी शर्ती लादल्या आहेत. Far from solving the water problem of Sambhajinagar
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरून शिवसेनेला जाब विचारण्यासाठी आज दुपारी 4.00 वाजता जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी शहरभर प्रचंड तयारी केली आहे. चौकाचौकात मोठे बॅनर लावून शिवसेनेला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 1600 कोटी रुपये मंजूर झाले. तो निधी महापालिकेकडे तसाच पडून आहे. त्याचे व्याज महापालिका खाते आहे पण पाणीपुरवठ्याचा प्रश्न महापालिकेने मार्गी लावला नाही, असा भाजपचा आरोप आहे.
भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला संभाजीनगरवासीयांचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे पाहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ठाकरे – पवार सरकारने आता या मोर्चाच्या संयोजकांवरच 14 अटी शर्ती लादल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेसाठी 16 अटी लादल्या होत्या. आता भाजप जल आक्रोश मोर्चासाठी 14 अटी लादल्या आहेत.
जायकवाडी धरण उशाशी, संभाजीनगर मात्र पाण्यासाठी उपाशी..! समांतर पाणी योजनेचे वाटोळे करून संभाजीनगरवासीयांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या राज्य सरकार आणि शिवसेनेविरुद्ध आज २३ मे रोजी दुपारी चार वाजता भव्य जल आक्रोश मोर्चा काढला जात आहे. राज्य सरकारच्या आणि शिवसेनेच्या या संभाजीनगराकडे दुर्लक्ष करण्याच्या धोरणाविरुद्ध रिकाम्या, कोरड्या घागरींचे पूजन केले. खरे तर भरलेल्या घागरींची पूजा ही आपली संस्कृती. पण या कोरड्या राज्य सरकारने कोरड्या घागरींचे पूजन करण्याची वेळ आपल्यावर आणली आहे.
जायकवाडी धरण उशाशी, संभाजीनगर मात्र पाण्यासाठी उपाशी..!
समांतर पाणी योजनेचे वाटोळे करून संभाजीनगरवासीयांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या राज्य सरकार आणि शिवसेनेविरुद्ध आज २३ मे रोजी दुपारी चार वाजता भव्य जल आक्रोश मोर्चा काढला जात आहे.
राज्य सरकारच्या आणि शिवसेनेच्या या संभाजीनगराकडे दुर्लक्ष करण्याच्या धोरणाविरुद्ध रिकाम्या, कोरड्या घागरींचे पूजन केले.
खरे तर भरलेल्या घागरींची पूजा ही आपली संस्कृती. पण या कोरड्या राज्य सरकारने कोरड्या घागरींचे पूजन करण्याची वेळ आपल्यावर आणली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App