पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांचे निधन

वृत्तसंस्था

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरचे प्रसिद्ध हॉटेल वैशाली आणि रुपालीचे मालक जगन्नाथ शेट्टी (वय ९१)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.Famous Hotel Vaishali, Rupali Owner Jagannath Shetty passes away

डेक्कनच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातवंड असा परिवार आहे.जगन्नाथ शेट्टी यांचा जन्म कर्नाटकातल्या ओणिमजालू या गावातला होता. १३ व्या वर्षी ते एका नातेवाईकासोबत महाराष्ट्रात आले.



तीन रुपये पगार असलेली नोकरी करत त्यांनी कारकीर्दीला सुरूवात केली.१७ व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या रुपाली आणि वैशाली दोन्ही हॉटेलमध्ये काम करायला सुरूवात केली आणि नंतर ते त्यांचेच मालक झाले.

पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत सचोटीने व्यवसाय करून स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श हॉटेल व्यावसायिक काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

हॉटेल वैशाली, रुपाली आणि आम्रपालीतून जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या हृदयात स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांची हॉटेल ही पुण्याच्या राजकीय, सामजिक, सांस्कृतिक चळवळींची केंद्र राहिली आहेत.

ते अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार होते. पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीतले तसेच पुणेकरांच्या मनातलं जगन्नाथ शेट्टी यांचे स्थान कायम राहील, असंही अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

Famous Hotel Vaishali, Rupali Owner Jagannath Shetty passes away

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात