प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची हॉटेल डिप्लोमसी फेल झाली असली तरी शेवटी विधान परिषद निवडणुकीसाठी त्याच हॉटेल डिप्लोमसीची “एटीकेटी परीक्षा” महाविकास आघाडी देणार आहे.”Fail” in Rajya Sabha elections: ATVT examination of Hotel Diplomacy for Mahavikas Aghadi Legislative Council elections !!
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांनी त्यांच्या आमदारांना निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून त्यांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. महाविकास आघाडीचा तो प्रयत्न फसला.
पण तरीही आता विधान परिषद निवडणुकीतही सर्व पक्ष दक्ष बनले आहेत. त्यासाठी पुन्हा हॉटेल डिप्लोमॅसी सुरु झाली आहे. त्याकरता राजकीय पक्ष हॉटेल बुकिंगसाठी धावपळ करू लागले आहेत.
काँग्रेससमोर आव्हान
विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याकरता २० जून रोजी मतदान होणार आहे. मात्र यावेळीच्या निवडणुकीत गुप्त मतदान होणार आहे, त्यामुळे आमदार फोडण्याची शक्यता बळावणार आहे. अशा वेळी शेवटपर्यंत आपल्या पक्षाच्या आमदारांचा संपर्क होऊ नये, म्हणून त्यांना आपल्या नजरेसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवसेना आमदारांना पवईतील रेडिसन हॉटेलमध्ये ठेवणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी आमदारांना नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये ठेवले होते. त्याप्रमाणे भाजपही त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे.
यंदा विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची दुसरी जागा अडचणी आली आहे, तर भाजप अधिकची पाचवी जागा लढत असल्यामुळे भाजपकडून राज्यसभेसारखी आमदार फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. म्हणून महाविकास आघाडीला यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या आमदारांना सुरक्षित ठेवणे हे आव्हान आहे. त्यामुळे आता हॉटेल डिप्लोमॅसीला पुन्हा जोर आला आहे.
अनिल परब यांना अडचणीत आणणार
राज्यसभा निवडणुकीत मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानासाठी जामीन नाकारण्यात आल्याने महाविकास आघाडीची २ मते कमी झाली होती, आता मलिक आणि देशमुख यांनी पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. मात्र दुसरीकडे आता शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या विरोधातही ईडीची कारवाई जोर धरत आहे. त्यामुळे जर ही कारवाई वाढली तर अनिल परब अडचणीत येतील आणि त्यामुळे त्यांचेही मत कमी होण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App